You are currently viewing घारपी शाळेत विद्यार्थ्यांना वय व अधिवास दाखले वितरण

घारपी शाळेत विद्यार्थ्यांना वय व अधिवास दाखले वितरण

*घारपी शाळेत विद्यार्थ्यांना वय व अधिवास दाखले वितरण*

*बांदा*

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी व सावंतवाडी तहसिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद घारपी शाळेतील शंभर टक्के विद्यार्थ्यांना वय व अधिवास दाखल्यांचे वितरण करण्यात आले.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र गावकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या दाखले वितरण कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापक जे.डी.पाटील,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा यशोदा गावडे, ग्रामपंचायत सदस्य आनंद गावडे,संतोष कविटकर, अजित आसनोडकर,सहदेव गावडे,विजय कविटकर,रामा गावडे,संजना गावडे,रिया कविटकर,संचिता सावंत,संजना गावकर,अमृता कविटकर आदि मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आले.
यावेळी समग्र शिक्षा अभियान अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना मोफत स्काऊट गाईड गणवेशाचे वितरण करण्यात आले.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांनी जिल्हाधिकारी यांनी सेवा पंधरवडा अंतर्गत राबविलेल्या वय व अधिवास दाखला वितरण करावयाच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.तसेच समग्र शिक्षा अभियान अंतर्गत स्काऊट गाईड गणवेशाबरोबर विद्यार्थ्यांना स्काऊट स्कार्फ,बेल्ट, टोपी असे साहित्यही सर्व विद्यार्थ्यांना शासनाने मोफत पुरवणे अपेक्षित असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुरलीधर उमरे प्रास्ताविक आशिष तांदुळे तर आभार धर्मराज खंडागळे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले.

*घारपी शाळेतील विद्यार्थ्यांना वय व अधिवास दाखले वितरण प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र गावकर ,ग्रामपंचायत सदस्य आनंद गावडे ,मुख्याध्यापक जे.डी.पाटील‌ आदि*

प्रतिक्रिया व्यक्त करा