वेंगुर्ले ठाकरे शिवसेनेची आज मासिक सभा…
वेंगुर्ले
येथील ठाकरे शिवसेना पक्षाच्या वेंगुर्ले तालुका शाखेची मासिक सभा आज आयोजित करण्यात आली आहे. ही सभा शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, वेंगुर्ला येथे सकाळी ११ वाजता संपन्न होणार आहे. या सभेला शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा आणि धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहेत.तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांनी या सभेसाठी उपजिल्हाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, सर्व आजी-माजी सरपंच, माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक, माजी पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
