*सावंतवाडीत ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा*
_“महामानव ते बुद्धत्व – सर्वांसाठी एक चिंतनशील प्रवास” या विषयावर डॉ. संदीप कांबळे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन_
सावंतवाडी (प्रतिनिधी) :
सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ, मुंबई तसेच कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी, दोडामार्ग व गोवा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन रविवारी सावंतवाडी येथे उत्साहात आणि भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी बौध्याचार्य आयु. सहदेव कदम – ओरसकर यांनी त्रिशरण पंचशील व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. डॉ. संदीप कांबळे यांनी “महामानव ते बुद्धत्व – सर्वांसाठी एक चिंतनशील प्रवास” या विषयावर अत्यंत विचारप्रवर्तक व प्रभावी भाषण केले. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक क्रांतीचा आणि गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचा संगम उलगडत समाज परिवर्तनाचा संदेश दिला.
प्रमुख पाहुणे डॉ. विकास कठाणे यांनी बाबासाहेब व बुद्धांच्या विचारधारेचे विविध पैलू समजावून सांगत मानवतेचा खरा अर्थ उपस्थितांसमोर मांडला. कार्यक्रमास, अनिल पावसकर (कुडाळ), प्रेमानंद जाधव (वेंगुर्ला), शंकर जाधव (दोडामार्ग), वासंती परवार (गोवा), प्रज्ञा जाधव (महिलाध्यक्षा, सावंतवाडी), केंद्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी बी.एस. कदम पुरुषोत्तम कदम, राजन पावसकर, आर.एस. नेमळेकर, गुरुनाथ बांदेकर, मोहन परुळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महासंघातील सदस्य व त्यांच्या पाल्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कारमूर्ती आयु. परशुराम टिळाजी जाधव-माजगाव, आयु. डॉ. आकाश शिवाजी जाधव-आरोंदा, आयु. डॉ. रमेश लक्ष्मण कुणकेरकर-कुणकेरी, आयु. लाडू गोपाळ जाधव-कोलगाव, आयुनी. शीतल नारायण आरोंदेकर-आरोंदा, आयु. सोनाली सदानंद पावसकर-पावस कुडाळ, अॅड. सीताराम उत्तम पावसकर-पावस कुडाळ, अॅड. सिद्धार्थ प्रभाकर पावसकर-पावस कुडाळ, अॅड. नामदेव मठकर-मठ वेंगुर्ला, आयु. राहुल रमाकांत जाधव-दोडामार्ग, आयु. निलेश अर्जुन आयनोडकर-दोडामार्ग, आयु. महादेव दत्ताराम परवार-गोवा, आयु. उर्मिला महादेव गावकर-गोवा, आयु. सिद्धार्थ कृष्णा गावकर-गोवा यांचे स्मृतीचिन्ह, शाल देऊन सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सावंतवाडी कार्यकारिणीतील अध्यक्ष-महेंद्र सावंत, उपाध्यक्ष-अमित जाधव, सचिव-टीळाजी जाधव, खजिनदार-विनायक जाधव, ज्येष्ठ सल्लागार-नारायण आरोंदेकर, सदस्य-समीर जाधव, ओमकार कासकर, विशाखा जाधव, सोनल जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच सावंतवाडी तालुका महिला कार्यकारिणीतील अध्यक्षा-प्रज्ञा टीळाजी जाधव, सचिव-अन्विता अभय जाधव, खजिनदार-सान्वी संजोग जाधव, सदस्या-नीलिमा नारायण आरोंदेकर, सुस्मिता शिवाजी जाधव, गौतमी गोविंद जाधव यांनीही कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक जाधव आणि अमित जाधव तर प्रास्ताविक नारायण आरोंदेकर यांनी तर आभार संजोग जाधव यांनी मानले.
