*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*प्रीतगीत*
रिमझिम पाऊसधारा
त्यात भेट तुझी माझी
बेधुंद वाहतो वारा
बट केसांची गालावर तुझी
प्रेम धुंद पावसात
चल प्रितगीत गाऊ
सप्त सुरांच्या तालात
चल चिंब चिंब न्हाऊ
प्रेम धारा बरसती
वाहे धुंद धुंद वारा
तुझ्या कुशीत देई आज
मज प्रीतीचा निवारा
पहिल्या भेटीचा क्षण हा
आठवणीत गडे ठेवु
सांग प्रिये आजतुजशी
दूर कोठे घेऊन जाऊ ?
चल दूर दूर जाऊ
त्या क्षितिजा पलिकडे
प्रीतीचा पारिजात
फुलवु या ना गडे
नको तो समाज
नको जातपातं
त्याही पलीकडे ग
आहे आपल्या प्रेमाचं नातं
तिथेच बांधू या ग्
प्रेमाचं इवलसं झोपडे
मधुचंद्राची रात्र ती
साजरी करु या तिकडे
*शीला पाटील. चांदवड.*
