You are currently viewing मोती तलावात रिक्षाचालकाची आत्महत्या; मृतदेह १७ तासांनी सापडला

मोती तलावात रिक्षाचालकाची आत्महत्या; मृतदेह १७ तासांनी सापडला

*मोती तलावात रिक्षाचालकाची आत्महत्या; मृतदेह १७ तासांनी सापडला*

*आत्महत्येचं कारण अद्यापही अनिश्चित*

सावंतवाडी

सालईवाडा येथील रिक्षाचालक रमेश जाधव (वय अंदाजे ४५) यांनी बुधवारी रात्री सुमारे १०.३० वाजता मोती तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर तब्बल १७ तासांच्या शोध मोहिमेनंतर त्यांचा मृतदेह आज दुपारी तलावाच्या पात्रात आढळून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली होती.

मृतदेह शोधण्यासाठी स्थानिक गोताखोरांची मदत घेण्यात आली. बाबल अल्मेडा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तलावात उतरून अवघ्या काही मिनिटांत रमेश जाधव यांचा मृतदेह बाहेर काढला.

दरम्यान, त्यांनी आत्महत्या करण्यामागील कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरु आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा