You are currently viewing गेले ते कावळे… राहिले ते मावळे । त्या गद्दार नगरसेवकांचा धिक्कार असो । वैभववाडीत भाजपा कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी.

गेले ते कावळे… राहिले ते मावळे । त्या गद्दार नगरसेवकांचा धिक्कार असो । वैभववाडीत भाजपा कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी.

ते सहा नगरसेवक सेनेत गेल्याबद्दल सहा फटाक्यांच्या माळी लावत, पेढे वाटत संभाजी चौकात केला जल्लोष.

वैभववाडी
धिक्कार असो.. धिक्कार असो.. गद्दार नगरसेवकांचा धिक्कार असो. उडाले ते कावळे… राहिले ते मावळे. नितेश राणे आगे बढो.. हम तुम्हारे साथ है. भारतीय जनता पार्टीचा… विजय असो. या घोषणांनी वैभववाडी भाजपा कार्यकर्त्यांनी ते सहा नगरसेवक सेनेत गेल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
भाजपा कार्यकर्त्यांनी गेलेल्या सहा नगरसेवकांच्या नावाने सहा फटाक्यांच्या माळी पेटवून जल्लोष केला. वैभववाडी भाजपा पक्ष कार्यालय ते संभाजी चौकशी रॅली काढत त्या सहा जणांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी नासीर काझी, सभापती शारदा कांबळे, भालचंद्र साठे, अरविंद रावराणे, भारती रावराणे, स्नेहलता चोरगे, विद्या पाटील, सुधीर नकाशे, हुसेन लांजेकर, बाबा कोकाटे, संजय सावंत, संताजी रावराणे, बबलू रावराणे, सुनील भोगले, महेश गोखले, महेश संसारे, परब सर, प्रवीण रावराणे, उदय पांचाळ, प्रदीप नारकर, दाजी पाटणकर, दत्‍ताराम सावंत, अवधूत नारकर व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × one =