*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*
*मराठी भाषेची सौंदर्य स्थळे*
मराठी भाषेतील सौंदर्यस्थळे म्हणजे तिच्यातील भाषिक सौंदर्य, तिचे साहित्यिक आणि सांस्कृतिक महत्त्व तसेच तिच्या समृद्ध ऐतिहासिक वारशाचा उगम होय… यात मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा.. महाराष्ट्रातील तिच्या बोलीभाषांतील विविधता आणि तिच्यातून निर्माण झालेली समृद्ध साहित्य परंपरा यांचा समावेश होतो.
मराठी भाषेचे सौंदर्य हे ज्ञानेश्वरीत आहे असे बोलले जाते पण या भाषेचे सौंदर्य लीळाचरित्रात आहे. महानुभाव पंथाचे आद्य प्रवर्तक चक्रधरस्वामींनी लिहिलेल्या लीळाचरित्र मराठीचे भाषासौंदर्य प्रत्ययाला येते…
मराठी भाषेतील सौंदर्य स्थळे म्हणजे या भाषेची सांस्कृतिक ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारसा असलेली पर्यटन स्थळे उदा. ऐतिहासिक गडकिल्ले
सुंदर समुद्रकिनारे, थंड हवेची ठिकाणे ही सौंदर्य स्थळे मराठी भाषिक संस्कृती आणि महाराष्ट्राच्या नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव देतात… वाक्प्रचार, म्हणी, सुभाषिते, अलंकार ही आपल्या भाषेची अलंकार लेणी आहेत ज्यामुळे मराठी भाषेला सौंदर्य प्राप्त होते. भाषा अधिक अमृतमयी दळदार पद्धतीने सादर होते व आधीचा मराठी भाषेचा गोडवा हजार पटींनी द्विगुणित होतो
मराठी भाषेचे सौंदर्य केवळ शब्दांपुरते मर्यादित नाही तर त्यात अनेक पैलू आहेत…
मराठी भाषेतील सौंदर्यस्थळे म्हणजे भाषेची गोडी, तिचा समृद्ध साहित्यवारसा, विविध बोलीभाषा, तसेच तिच्यातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व होय ज्याचा अनुभव लेखणीतून, संवादातून आणि साहित्यातून येतो. या भाषेला ‘”अभिजात भाषेचा”‘ दर्जा मिळाल्याने तिच्या विकासाला नवीन दिशा मिळाली आहे… ज्यामुळे तिच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे…. त्याचबरोबर समृद्ध साहित्य परंपरा यामुळे मराठी भाषेने अनेक दशकांपासून अनेक श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण केल्या आहेत आणि या साहित्य निर्मितीचा प्रवाह आजही अविरत सुरू आहे… मराठी भाषेचे व्याकरण एक असले तरी कोंकणी मराठी, कोल्हापुरी मराठी, कारवारी मराठी, अहिराणी, मराठवाडी, नागपुरी यांसारख्या अनेक बोलीभाषांमुळे तिच्यात वैविध्यता आहे… या विविध बोलीभाषा आणि त्यांची संस्कृती जे भाषेच्या समृद्धीत भर घालतात नी समृद्धतेचे दर्शन घडवतात…
*अक्षर गुंफून*
*शब्दमाला सजली*
ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा प्राचीन असून त्याला अनेक वर्षांचा इतिहास आणि महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य म्हणून तिला एक विशेष स्थान ही प्राप्त झाले आहे…
मराठी भाषेत ज्ञानेश्वर, मुकुंदराज आणि इतर अनेक कवी-लेखकांनी उत्कृष्ट साहित्यकृती निर्माण केल्या आहेत. ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथांमधून मराठी भाषेचे सौंदर्य आणि सामर्थ्य स्पष्टपणे दिसून येते… ज्ञानेश्वरी आणि विवेकसिंधु हे ग्रंथ जी मराठी संस्कृती आणि भाषेचा अनुभव देतात… संतांचे अभंग आपल्या रोजच्या आयुष्यात कानावर पडतातच…
“पसायदान” ज्ञानेश्वरांनी देवाकडे आशीर्वाद मागितला ती ही प्रार्थना… निरपेक्ष भावना म्हणजे काय हे ओवी शिकवते. प्रत्येक ओवीचा नव्याने वेगळा अर्थ प्रतीत होतो… पंढरपूर, आळंदी आणि देहू यांसारखी धार्मिक स्थळे मराठी साहित्याला आणि भक्तीपर परंपरेला जोडलेली आहेत. संत ज्ञानेश्वरांचे कार्य मराठी भाषेसाठी एक महत्त्वाचे सौंदर्यस्थळ आहे.
महाराष्ट्रातील अनेक किल्ले जसे की रायगड, सिंहगड आणि प्रतापगड, मराठीच्या इतिहासाचे आणि शौर्याचे प्रतीक आहेत. ही स्थळे मराठी भाषेला एका वेगळ्या अर्थाने सौंदर्य प्रदान करतात.
बहिणाबाई चौधरी हे मराठी भाषेतलं एक असं पान आहे जे कधीही उघडलं तरी सहजपणे विचार करायला प्रवृत्त करणारे शब्द मनात घर करून राहण्यास भाग पाडतं..
आबालवृद्ध सगळ्यांनाच समजेल अशी सहज भाषा आणि ओघवती शैली यामुळे ते शब्द पटकन मनात रुंजी घालू लागतात… शांताबाई शेळके यांची मला स्वतःला त्यांची आवडलेली कविता म्हणजे “जय शारदे वागीश्वरी “… अपूर्वाई हे पु.ल च पुस्तक जास्त आवडलेलं…
*सुरेख साज चढवला*
*अलंकारिक शब्दांचा*
मराठी भाषा ही महाराष्ट्राची ओळख आहे आणि तिच्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास आणि संस्कृती सामावलेली आहे… मराठी भाषेतील शब्द, म्हणी आणि वाक्यरचना जीवनाच्या विविध अंगांना व्यक्त करण्याची क्षमता ठेवतात…
थोडक्यात मराठी भाषेतील सौंदर्य म्हणजे तिचा गोडवा, साहित्य, बोलीभाषा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक परंपरांचा संगम होय…
*मराठी भाषेचे सौंदर्य कोंदणात सजले*
लेखिका/ कवयित्री
संगीता कुलकर्णी— ठाणे@
9870451020

