कणकवली:
कणकवली तालुक्यातील कासार्डे येथे अनधिकृत पणे सिलिका वाळू काढली जाते. हा उद्योग गेले कित्येक वर्षे चालू आहे. ही वाळू घाट माथ्यावर ट्रकने वाहतूक करून दामदुप्पट पैसे मिळवले जातात. यामुळे सरकारी महसूल मोठ्या प्रमाणात बुडतो, तरी अधिकृत खाणी किती व अनधिकृत खाणी किती याची प्रतक्ष्य तेथे जाऊन पाहणी करावी असे निवेदन मा. तहसीलदार साहेबाना देण्यात आले. तसेच महसूलमंत्री मा. बाळासाहेब थोरात यांच्याकडे तक्रार करण्यात येईल, असे श्री महिंद्र सावंत सरचिटणीस सिंधुदुर्ग जिल्हा कमिटी यांनी सांगितले. तसेच यावेळी कणकवली तालुका उपाध्यक्ष श्री तळेगावकर, उपाध्यक्ष डॉ घाडीगांवकर उपस्थित होते.