*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*नवी दिवाळी*
वृत्त: पादाकुलक
दंवात ये तू भल्या सकाळी
करू साजरी पुन्हा दिवाळी
ग्रंथ फेकले तोंडा वरती
मेंदू मध्ये जमली जाळी
“पुढारलेले ” बिरूद होते
ठरली आता जगात गाळी
अंधारावर मात करुनी
सूर्य रेखिले त्यांनी भाळी
लढ्यास होत्या आधाराला
गिरणगावच्या जुनाट चाळी
सहकाराची बाग लावली
चोर निघाला स्वतः च माळी
मुलगी येता माहेराला
गोळा झाली सारी आळी
नाक्यावरती दर सिग्नलला
ऐकू येते करूण टाळी
विज्ञानाला जवळ करा रे
जगास साऱ्या देतो हाळी
श्रीनिवास गडकरी
रोहा पेण पुणे
केवळ नावासहितच पुढे पाठवावे
@सर्व हक्क सुरक्षित
