*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*नसून हातात कुठला बावटा*
त्यांना सुध्दा हवय *आरक्षण*
म्हणून काढला *मोर्चा मोठा*
एका सुरात एका “आवाजात”
नसून हातात कुठला *बावटा*
//1//
शिस्तही होती *त्यांच्यामध्ये*
आवाज त्यांचा होता मर्यादित
नव्हती घोषणा अर्वाच्य शब्दात
अब्दुल्ला नव्हता नाचाला शादीत
//2//
नाही ऐकली शिवराळ भाषा
तमाशा नव्हता कुठेही चौकात
आदर्श घ्यावा *बदकांपासून*
राजकीय मोर्चे जातात डोक्यात
//3//
आरक्षणाची खाण्या खिरापत
*नव्हती निघत “उणी दुणी”*
पांढरी काळी आणि राखाडी
मांडत होती आपली गाऱ्हाणी
//4//
नेते होते *शिकले सवरलेले*
नव्हता दिसत वागण्यात माज
गिनीज बुकात झाली नोंदणी
आदर्श जगातील *पक्षी राज*
//5//
तीर्थ घ्यावे बदकांचे सर्वांनी
*अक्कल वाढेल बक्कळ*
नाहीत धमक्या नाही मुजोरी
घोषणाही ऐकायला निर्मळ
//6//
आदर्श गिरवावा शहाण्यांनी
ठेवून आपला मान सन्मान
नव्हती गेली बदके शाळेत
तरीही मिळाला त्यांना मान
//7//
नाही माजोरडा डिजे आवाज
बॅक बॅक आवाजाचा साधा बॅन्ड
नाही प्रदर्शन *बीभत्सगिरीचे*
फाट्यावर मारले सारे *ब्रॅन्ड*
//8//
विनायक जोशी🖋️ ठाणे
मीलनध्वनी/9324324157
