*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”दवणा”*
दवणा वनस्पती आहे निसर्गाचे देणं
माणसाच्या जीवनी देई उमंग चैतन्यIIधृII
सुगंधी तेल बनते दवणा पासून
हार गजरा शोभे शृंगार वाटे प्रसन्न
बहुउपयोगी व्यंजन खाद्य पदार्थांतII1II
खोडावर लव राहे गुच्छ हिरवे पिवळट
गोल लहान फळ बिया काळया लांबट
पर्ण बियांचा उपयोग होतो आयुर्वेदांतII2II
कफ वांती व्रण कंठ रोगावर औषध
रक्तदोष कान दुखी जलोदर अग्निमांद्य
औषोधोपयोगी असून करी व्याधी मुक्तII3II
ज्योतिबा शंकराला खंडोबाला वाहतात
पित्त शामक करी रस त्रिदोष शमन
मनुष्याला देई आरोग्य राखे तंदुरुस्तII4II
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.

