You are currently viewing पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांचे ऑनलाईन उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांचे ऑनलाईन उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांचे ऑनलाईन उद्घाटन

सिंधुदुर्गनगरी 

उद्योग 4.0 युगामध्ये तंत्रज्ञानधिष्ठित कौशल्ययुक्त मनुष्यबळाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांना तसेच सामान्य इच्छुक उमेदवारांना आधुनिक तंत्रज्ञान व सेवा क्षेत्राशी सुसंगत प्रशिक्षण देऊन औद्योगिक क्षेत्रास आवश्यक कुशल मनुष्यबळ पुरविणे या उद्देशाने राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाशासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये रोजगारक्षम अल्पमुदतीचे अभ्यासक्रम सुरु करण्याचे निर्देश शासनाने दिलेले आहेत.

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक 8 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता महाराष्ट्रातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये या अभ्यासक्रमांचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाओरोसयेथे पहाता येणार आहे.

जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, त्याचप्रमाणे सदर कार्यक्रमामार्फत अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांचा प्रचार व प्रसार होण्याकरिता जिल्ह्यातील विविध कार्यलयामार्फत औद्योगिक आस्थापनाऔद्योगिक संघटनालाडकी बहिण योजनाचे लाभार्थीपीएम विश्वकर्मा योजनेचे लाभार्थीआचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रप्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास कार्यक्रम योजनेचे लाभार्थीद्विलक्षी अभ्यासक्रमाचे लाभार्थी यांना निमंत्रित करण्यांत आलेले आहे.

त्याचप्रमाणे शासकीय,अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेतलेलेप्रशिक्षण पूर्ण केलेले आजी माजी प्रशिक्षणार्थी व पालक यांनी देखील दिनांक 08 ऑक्टोबर 2025 रोजी होणाऱ्या ऑनलाईन उदघाटन कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन ओरोस औद्योगिक प्रशिक्षण संस्थेंचे प्राचार्य  ए.एस. मोहारेयांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा