You are currently viewing एनसीसीच्या कॅडेटस्नी केली नवाबाग किना-याची स्वच्छता

एनसीसीच्या कॅडेटस्नी केली नवाबाग किना-याची स्वच्छता

वेंगुर्ला

जागतिक पाणथळ दिनाचे औचित्य साधून पुनित सागर अभियानांतर्गत बॅ.खर्डेकर महाविद्यालय व पाटकर हायस्कूलच्या एनसीसी युनिटतर्फे नवाबाग किनारी स्वच्छता मोहिम राबविली.
यावेळी ३० एसडी, एसडब्ल्यू व २० जेडी, जेडब्ल्यू कॅडेटस् तसेच एनसीसी ऑफिसर्स लेफ्टनंट डॉ.बी.जी.गायकवाड, लेफ्टनंट सुशांत धुरी आणि जे.सि.ओ. जितेंद्र तिवारी, एन.सी.ओ. जगदीश उपस्थित होते. ही स्वछता मोहीम कर्नल दीपक दयाल, कमांडिंग ऑफिसर व ५८ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शननुसार राबविण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − eight =