You are currently viewing ‘जल हे विश्व’ नाट्यरूपकातून उमटणार पाणी संवर्धनाचा स्वर

‘जल हे विश्व’ नाट्यरूपकातून उमटणार पाणी संवर्धनाचा स्वर

कोकण पाटबंधारे विकास महामंडळातर्फे शेतकऱ्यांसाठी प्रबोधनात्मक उपक्रम सावंतवाडीत

सावंतवाडी :

कोकण पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ यांच्यामार्फत गुरुवार ९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता सावंतवाडीत शिल्पग्राम रोड येथील मांगिरीश बॅन्क्वेट हॉलमध्ये ‘जल हे विश्व’ या शेतकऱ्यांसाठी प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

छत्रपती संभाजी नगर येथील आरती क्रिएशन पाणी वापर संस्थेवर आधारित नृत्य नाटीकेद्वारे हा कार्यक्रम सादर करणार आहेत. पाणी वापर संस्थेचे महत्त्व, अधिकार आणि पाणी व्यवस्थापनाद्वारे सिंचनाच्या पाण्याचा शाश्वत आणि प्रभावी वापर ही काळाची गरज आहे. शेतकऱ्यांमध्ये जनजागृती घडविण्यासाठी सांस्कृतिक माध्यमातून सादर होणारे हे प्रभावी नाट्यरूपक शेतकरी वर्गांसह सर्वांनाच विचार करायला भाग पाडणार आहे.

कार्यक्रमाला शेतकरी वर्गाने उपस्थित राहावे असे आवाहन सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री जाधव यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा