You are currently viewing जिल्ह्यातील ७० पैकी ७० ग्रामपंचायतींवर भाजपचाच झेंडा फडकेल

जिल्ह्यातील ७० पैकी ७० ग्रामपंचायतींवर भाजपचाच झेंडा फडकेल

सावंतवाडी
राज्यातील महाआघाडी सरकार जनतेच्या सर्वच प्रश्नांच्या बाबतीत सर्वतोपरी अपयशी झाल्यानेच सत्ताधारी पक्षातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपात प्रवेश करीत आहेत. यापूर्वीही कणकवली, देवगड, वैभववाडी, मालवण वेंगुर्ला, कुडाळ या भागात अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपात प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. पुणे भाजपची ताकद अधिकच वाढली असून होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यातील ७० पैकी ७० ग्रामपंचायतीवर भाजपचाच झेंडा फडकेल, असा विश्वास यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी व्यक्त केला. यावेळी नगराध्यक्ष संजू परब, तालुकाध्यक्ष संदीप गावडे, मनोज नाईक, आनंद नेवगी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine − 4 =