*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना*
!! चंद्रही झाला बोलका !!
आज मी धुंद
माझ्यातच बेधुंद
ओठांवरी गीत
जणू एक मर्मबंध
पाहूनी पौर्णिमेचा चंद्र
आले उधाण मनास
छेडता अल्लड सूर
हलकेचं ओठांवर
बहरले अबोल शब्द
झुलले माझे मन
चांदण्यांच्या हिंदोळ्यावर
अशी रात आज कोजागरी
गेली सांगून काहीतरी
चांदण्यात गेले न्हाऊनी
मला पाहूनी त्या तिथे… वेडीला
चंद्रही झाला बोलका…!!
*कोजागरी पौर्णिमेच्या शुभेच्छा* 🌹🌹
लेखिका/ कवयित्री
संगीता कुलकर्णी— ठाणे@
9870451020

