You are currently viewing स्वप्नं तुझी माझी

स्वप्नं तुझी माझी

स्वप्नं तुझी माझी

तुझ्या माझ्या स्वप्नांचा,
डोलाराच खूप मोठा.
तू झोपून स्वप्न पाहतेस,
मी जागेपणीच स्वप्न होतो.

तुझ्या स्वप्नात तू पार
भान हरपून जातेस.
मी मात्र माझं स्वप्न,
फक्त तुझ्यातच शोधतो.

तुझी स्वप्न आशेचा किरण,
माझी स्वप्न किरणात हसतात.
हसता हसता झोपी जातात.
तुझी डोळे उघडताच संपतात,

तुला खूप मोठं व्हायचंय,
मला अभिमानाने पहायचंय.
तू मोठं झालेलं पाहून,
मान उंचावत जगायचंय.

तुझ्या छोट्या छोट्या इच्छांना,
कवेत तुलाच घ्यायचंय.
अपेक्षांचं ओझं नको मनावर,
निरपेक्ष जीवन जगायचं.

तुझी नी माझी स्वप्नं ती,
नव्हती कधीच वेगळी गं…
तुझ्या डोळ्यांच्या…
पापण्यांवरून उडालेली,
माझ्या डोळ्यांच्या…
पापण्या आड लपलेली…..!

(दिपी)✒️
दीपक पटेकर
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 5 =