You are currently viewing चांदणं

चांदणं

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*चांदणं*

 

शरदाला म्हटलं

तुझं चांदणं मला देशील का

हळूच म्हणाला…

केशर दुधात

चंद्राला बघशिल का

त्यासाठी कोणाला तरी

जागर करावा लागतो

चंद्र रात्रीला डोक्यावर येतो

त्याच्या शितल प्रकाशात

अलवार गारव्यात

दुधाचा रंग बदलतो

केशराच्या सुगंधात

चांदण्या रात्रीला

कोजागिरीला

पुणवेच्या चंद्राला बघशिल

तेंव्हा

शरदाचं चांदणं

अनुभवशील…

 

कवी:-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर, धुळे.*

प्रतिक्रिया व्यक्त करा