You are currently viewing देवा! कां कपाळावर तुझ्या आठी!

देवा! कां कपाळावर तुझ्या आठी!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*देवा!कां कपाळावर तुझ्या आठी!*

 

तुझ्या रूपात हरखून

भरतो हदयातल्या जागा

जोडून हात!तुझ्याच दारात

शोधतो प्रभू!तुझ्या घरचा धागा

 

देवा !तुझी सावली शुभ्र

तुला प्रकाश पीता येतो

तुझं प्रतिबिंब ओलं

तुझं असणं आधार देतो

 

निघालं मढ सरणावर

किरवंताना झाली घाई

कुडीत अडकला जीव

देवा!अजून तू दर्शन दिले नाही

 

जन्मागत मरण येते

तुझ्या दारी विसावते आशा

गर्भाचे भान गर्भातच राहते

गर्भच शोधतो!देवा तुझा नकाशा

 

आधाराला दिलीस तू काठी

देवा!कां तुझ्या कपाळावर आठी

उशीर केलास!लांबवू नकोस हा सोहळा

दर्शन दे!अन् लवकर हो की मोकळा

 

बाबा ठाकूर …धन्यवाद

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा