You are currently viewing कणकवली नगराध्यक्ष पदासाठी नागरिक मागास प्रवर्गाचे आरक्षण

कणकवली नगराध्यक्ष पदासाठी नागरिक मागास प्रवर्गाचे आरक्षण

तीन वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर निवडणुकीची चाहूल; इच्छुक उमेदवारांची मोर्चेबांधणी सुरू

 

कणकवली :

राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत आज मंत्रालयात जाहीर करण्यात आली. सिंधुदुर्गातील कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी नागरिक मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) हे आरक्षण निश्चित झाले आहे. गेली तीन वर्षे नगरपंचायतीवर प्रशासकीय राजवट होती. आता पुन्हा नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवारांची मोर्चेबांधणी सुरू होणार आहे. दरम्यान, ८ ऑक्टोबर रोजी नगरसेवक पदांच्या आरक्षणाची सोडत जाहीर होणार असून, त्यामुळे लवकरच नगरपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजण्याची चिन्हे दिसत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा