You are currently viewing शेर्लेतील युवकांकडून पणदुर आश्रमाला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप…

शेर्लेतील युवकांकडून पणदुर आश्रमाला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप…

बांदा

प्रतीवर्षीप्रमाणे यावर्षीही वाढदिवसाचे औचित्य साधून समाजाप्रती आपल्या बांधिलकीच्या भावनेतून शेर्ले येथील युवक मुकेश खोबरेकर यांनी आपल्या मित्रमंडळीसह पणदूर येथील संविता आश्रम येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
यावेळी श्री खोबरेकर यांचा वाढदिवस आश्रमातील बंधु-भगिनींनी साजरा केला. यावेळी साईनाथ धारगळकर, प्रशांत कासार, संदीप नार्वेकर, सुशील गुळेकर, सोमनाथ भांबुरे, रोहिदास कळंगुटकर आदी उपस्थित होते.

यावेळी रोजच्या वापरातील जीवनावश्यक वस्तू व धान्य देण्यात आले. या सामाजिक कार्यासाठी सिद्धेश वेंगुर्लेकर, जयंत महाबळ, विराज नेवगी, दयानंद नेवगी, अर्चना महाले, सखी गुळेकर, आनंदी वराडकर, प्रकाश बांदेकर यांनी सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − one =