You are currently viewing वीज कंत्राटी कामगारांचा तीन दिवसीय संपास पाठिंबा- जिल्हा अध्यक्ष आनंद लाड

वीज कंत्राटी कामगारांचा तीन दिवसीय संपास पाठिंबा- जिल्हा अध्यक्ष आनंद लाड

वीज कंत्राटी कामगारांचा तीन दिवसीय संपास पाठिंबा- जिल्हा अध्यक्ष आनंद लाड

10 ऑक्टोबरपासून कामबंद आंदोलन

सिंधुदुर्ग

राज्यातील वीज क्षेत्रातील विविध मागण्यांसाठी 9, 10 व 11 ऑक्टोबर रोजी तीन दिवसीय संपाची हाक देण्यात आली असून या संपास महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

वीज कंत्राटी कामगारांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्या व सध्याच्या समस्यांबाबत संघटनेने वेळोवेळी माननीय ऊर्जामंत्री, शासन आणि प्रशासन यांना निवेदने दिली आहेत. मात्र अद्याप त्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याची खंत संघटनेने व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर, राज्यातील सुमारे 42,000 वीज कंत्राटी कामगार 9 ऑक्टोबर रोजी काळ्या फिती लावून आपला निषेध नोंदवतील. त्यानंतर 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 1.30 वाजता “द्वार सभा” घेण्यात येणार असून त्यानंतर कामबंद आंदोलन सुरू केले जाईल, अशी माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष निलेश खरात यांनी दिली.

संघटनेचे प्रदेश सरचिटणीस व भारतीय मजदूर संघाचे उपाध्यक्ष मा. सचिन मेंगाळे यांनी विश्वास व्यक्त केला की, राज्याचे ऊर्जामंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नक्कीच योग्य निर्णय घेऊन वीज कंत्राटी कामगारांना न्याय दिला जाईल.

या आंदोलनामागील उद्देश संघर्ष नव्हे तर संवाद आहे आणि चर्चा होऊन समस्या मार्गी लावाव्यात, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे.

जिल्हा अध्यक्ष आनंद लाड
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ
(संलग्न – भारतीय मजदूर संघ)
ई-मेल: mvkksangh@gmail.com

 

प्रतिक्रिया व्यक्त करा