*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आज सजली कोजागरी*
गारवा हवेत किंचित
स्वच्छ नितळ नभावरी
शुभ्र चांदणे बरसले अन्
आज सजली कोजागरी…
कृत्रिम ते दीप विझवा
बघा दीप चांदण्यांचे
आभाळाच्या भाळावर
तिलक शोभे शशीकराचे…
एकमेका साद घालू
विसरून सारे जुने
चंद्रकिरणात न्हाऊ
रजतरसाच्या तेजाने…
गप्पा गोष्टी कला सुंदर
आटवून दूध केशरी
आस्वाद घेत कोजागरीला
पूर्ण चंद्र येई अंबरी….
अरुणा दुद्दलवार ✍️
