You are currently viewing कोजागरी

कोजागरी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कोजागरी* 🌹

 

कोजागरीचा चंद्रमा

आकाशात झळकतो

मैत्री करण्या माझ्याशी

नकळतच हासतो

 

शुभ्र रूप बाई त्याचे

दुरूनच न्याहाळते

लख्ख चांदण्यात मी

न्हाऊनीया निघते

 

बंधु,सखा माझा तु

दररोज भेटतो

भाऊबीजेच्या दिवशी

अंगणी उभा ठाकतो

 

मामा मुलांचा ना रे तू

वाटते सामोरी दिसावा

आजच्या दिनी ये अंगणी

आम्हा बरोबरी घे विसावा

 

पडता प्रतिबिंब दुधात

दिसते रुप गोजिरे

अमृताहुनी गोड

प्राशन करती मुले साजिरे

 

दुजाभाव न करता

सर्वांसाठी प्रकाशतो

आजच्या दिनी चंद्रमा

वंदन तुजला करतो

 

*शीला पाटील. चांदवड.*

प्रतिक्रिया व्यक्त करा