कार्यकर्ते आक्रमक; दुरुस्तीसाठी आवश्यक निधी नाही, अधिकाऱ्यांची खंत…
दोडामार्ग
वाहतुकीस धोकादायक ठरत असलेल्या दोडामार्ग बेळगाव या रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करण्यात यावे,या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गवस,संदेश वरक,पराशर सावंत यांनी आज रास्ता रोखून धरला.दरम्यान जोपर्यंत त्यासाठी आवश्यक असलेला निधी मिळत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही.अशी भूमिका त्यांनी घेतली. परंतु त्या ठिकाणी दाखल झालेले बांधकाम विभागाचे उपअभियंता विजय चव्हाण यांनी या रस्त्यासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध नाही. त्यामुळे आम्ही आश्वासने देऊ शकत नाही, असे सांगितले. त्यामुळे आंदोलन सुरू ठेवण्यात आले. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.