You are currently viewing कुर्ला देवी यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांना आणि ग्रामस्थांना नवीन कुर्ली विकास समिती अध्यक्ष अनंत पिळणकर यांच्याकडून स्वागत

कुर्ला देवी यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांना आणि ग्रामस्थांना नवीन कुर्ली विकास समिती अध्यक्ष अनंत पिळणकर यांच्याकडून स्वागत

कणकवली

आज कुर्ली गावचे आराध्य दैवत कुर्ला देवीची यात्रा संपन्न होत आहे. या यात्रेला येणाऱ्या भाविक आणि ग्रामस्थांचे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा नवीन कुर्ली विकास समिती अध्यक्ष अनंत पिळणकर यांच्याकडून स्वागत करण्यात येत आहे.

कुर्ला देवी ही कुर्ली गावचे आराध्य दैवत आहे. या देवीच्या यात्रेने जिल्ह्यातील यात्रोत्सवाला सुरवात होते. जिल्ह्यातील अत्यंत जागृत देवस्थान म्हणून या देवीची ख्याती आहे. या उत्सवाला जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. सध्या कोरोनाचा काळ सुरू असल्याने भाविकांनी शासनाच्या नियमानुसार सामाजिक अंतर राखताना तोंडाला मास्क लावावे, मंदिराच्या परिसरात थुंकू नये, उत्सवाचे पावित्र्य राखतानाच कोरोनाच्या अनुषंगाने शासनाने घालून दिलेले नियम पाळावेत असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा नवीन कुर्ली विकास समिती अध्यक्ष अनंत पिळणकर यांनी केले आहे.

या यात्रोत्सवाला येणाऱ्या सर्वांचे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा नवीन कुर्ली विकास समिती अध्यक्ष अनंत पिळणकर यांच्यासह राष्ट्रवादी देवगड विधानसभा युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, युवक जिल्हा सदस्य जयेश परब, सखाराम हुंबे, सेनापती सावंत, उत्तम तेली, संतोष तेली, अरुण चव्हाण, दीपक चव्हाण, महेश चव्हाण, शिवाजी चव्हाण यांनीही स्वागत केले असून सर्वाना देवीच्या आशीर्वादाने उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 − 3 =