You are currently viewing शिडवणे शाळेतील शिक्षकांचे काम कौतुकास्पद – रवींद्र जठार

शिडवणे शाळेतील शिक्षकांचे काम कौतुकास्पद – रवींद्र जठार

शिडवणे कोनेवाडी शाळेला ग्रा.प.कडून दोन वॉटर फिल्टर भेट

तळेरे

सन 2020 21 या शैक्षणिक वर्षात ऑनलाइन, ऑफलाइन झालेल्या स्पर्धातून विद्यार्थ्यांनी मिळवलेले प्राविण्य, याचा बक्षीस वितरण सोहळा नुकताच शिडवणे कोनेवाडी या शाळेत संपन्न झाला. त्यावेळी रवींद्र जठार वित्त व बांधकाम सभापती जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी त्यांनी सर्व शिक्षकांबद्दल कौतुकास्पद गौरउद्गार काढले. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या प्रविण्याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यास सचिन पाटणकर यांनी १००० रुपयाचे बक्षीस जाहीर केल्याप्रमाणे कु. सार्थक संजय कुयेस्कर याला देण्यात आले , तसेच बाह्य परीक्षा मध्ये जे विद्यार्थी प्रथम येतील त्या विद्यार्थ्यास माजी पंचायत समिती सभापती सोनाली शिर्सेकर यांनी 1111/- रुपये बक्षीस जाहीर केल्याप्रमाणे कु.सिद्धि संदीप पाटणकर हिस देण्यात आले.

शिडवणे ग्रा.प.कडून शाळेला दोन वाॅटर फिल्टर भेट….

याप्रसंगी शिडवणे ग्रामपंचायतीकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिडवणे कोनेवाडी शाळेसाठी दोन वॉटर फिल्टर भेट दिले. शाळेतील पाच विद्यार्थ्यांना शालेय गणवेश प्राप्त होण्यासाठी माऊली वारकरी संप्रदाय शिरवणे यांच्याकडून आर्थिक मदत करण्यात आली त्याबद्दल त्यांचेही आभार मानले.
या कार्यक्रमास व्यासपीठावर सरपंच शीतल जाधव, उपसरपंच तथा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक पाटणकर तसेच तळेरेे प्रभाग शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे, शेर्पे केंद्राचे केंद्रप्रमुख सद्गुरु कुबल, ग्रामपंचायत सदस्य अनिल पांचाळ, दीपिका शेट्ये, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष साक्षी चव्हाण, काशिनाथ बेळणेकर, संचिता पाटणकर, संजीवनी शिर्सेकर, सारिका शिर्सेकर, साक्षी शिर्सेकर, दिपाली टक्के, महेंद्र टक्के उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक शिक्षक श्री मंगेश खांबळकर यांनी केले. प्रास्ताविक प्राथमिक शिक्षिका श्रीम अरुणा वाळवेकर यांनी केले आणि कार्यक्रमाचे शेवटी मुख्याध्यापक प्रशांत कुडतरकर यांनी सर्वांचे आभार मानले.


शिडवणे:
विद्यार्थ्यांचा गुणगौरव करताना वित्त व बांधकाम समिती सभापती रवींद्र जठार सोबत श्री दीपक पाटणकर उपसरपंच, श्री सुहास पाताडे शिक्षण विस्तार अधिकारी, श्री सद्गुरु कुबल केंद्रप्रमुख व इतर मान्यवर

प्रतिक्रिया व्यक्त करा