शैक्षणिक प्रकरणे ऑनलाईन पध्दतीने सादर करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक/माजी सैनिक विधवा पत्नी यांनी सन २०२४-२५ ची शैक्षणिक प्रकरणे के. एस. बी. (KENDRIYA SAINIK BOARD) ला ऑनलाईन पध्दतीने सादर करण्याची On Line Site दिनांक २४ सप्टेंबर २०२५ पासून सुरू झाली आहे.
तरी पात्र माजी सैनिक,माजी सैनिक विधवा पत्नी यांनी आपली के. एस. बी. प्रकरणे (जसे की पाल्यांची १ ली ते ९ वी पर्यंतची शैक्षिणक प्रकरणे, १० वी ते १२ वी ची शैक्षिणक प्रकरणे, PM Scholarship, Pemury Grant व मुलीचा विवाह) केंद्रिय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांना सादर करावयाचे आहे.
संबंधित माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी यांनी प्रकरण सादर करताना घ्यायवाची दक्षता – सैनिक कल्याण विभाग पुणे यांचे DSW PUNE या संकेतस्थळावर माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीर नारी यांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे अनिवार्य आहे. अर्जात सर्व माहीती केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांनी दिलेल्या नमुन्यात सर्व माहीती पूर्ण भरावयाची आहे. त्यासाठी आता नवीन प्रणालीसाठी स्वतःचा ई-मेल आयडी अनिवार्य आहे. सर्व मुळ कागदपत्रे Upload करावी. कोणत्याही प्रकारची Zerox Upload करू नये. प्रकरण ऑनलाईन पध्दतीने स्वतः Upload करावी अथवा ज्या Net Café ला माहीती आहे किंवा त्यांनी यापूर्वी अशी प्रकरणे केलेली असल्यासच त्यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरुन घ्यावेत.
संबधित माजी सैनिक/माजी सैनिक विधवा पत्नी यांनी प्रकरण सादर केल्यानंतर करावयाची कार्यवाही याप्रमाणे- On Line Site वर Upload केलेला अर्ज घेऊन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदर्ग येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष हजर राहून कागदपत्रांची पडताळणी करुन घ्यावी. येताना Upload केलेल्या अर्जासोबत सर्व मुळ कागदपत्रे सोबत आणावीत. (जसे की Discharge Book, Identity Card, PPO, Aadhar Card, Declaration Certificate, Bank Pass Book. Mark List). या कार्यामार्फत संबंधित माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी यांचे समोरच त्यांचा अर्ज ऑनलाईन पध्दतीने तपासून सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्याकडे पाठविण्यात येईल. कोणत्याही परीस्थीतीत मौखिकरित्या किंवा दुरध्वनीव्दारे कळवून प्रकरणे तपासली जाणार नाहीत यांची नोंद घ्यावी. तसेच निर्धारीत वेळेत प्रकरणातील त्रुटींची पुर्तता न केल्यास किंवा प्रकरण रद्द झाल्यास संबंधित लाभार्थी त्यास जबाबदार राहील यांची नोंद घ्यावी.
तरी पात्र माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी यांनी या कार्यालयाला सहकार्य करुन या योजनांचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र. ०२३६२-२२८८२० वर संपर्क करावा असे, आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
