कौशल्य प्रशिक्षण देण्याकरीता नाव नोंदणी करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यातील ३५ ते ४५ वयोगटातील माजी सैनिकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत दूरध्वनीव्दारे किंवा नियुक्त केलेल्या Data Operator मार्फत संपर्क केल्यास कौशल्य विकासाचे मार्गदर्शन व प्रशिक्षण घेण्यासाठी योग्य ती माहीती दिनांक ०५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सादर करून सहकार्य करावे, कौशल्य विकासाचे मार्गदर्शन व प्रशिक्षण अभ्यासक्रमाची यादी Google Form मध्ये hhtps://forms.gle/
कौशल्य विकासाचे मार्गदर्शन व प्रशिक्षण घेणाऱ्या माजी सैनिकांची माहीती Google Form मध्ये भरुन घेण्यासाठी ०१ Data Operator रु. १०,०००/- फक्त एका महीन्यासाठी नियुक्त करण्यास संचालक, सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांची मान्यता मिळाली आहे. तरी कौशल्य विकासाचे मार्गदर्शन व प्रशिक्षण घेणासाठी माजी सैनिकांची माहीती भरण्यासाठी Data Operator म्हणून काम करण्यास इच्छुक असणाऱ्या माजी सैनिकाने आपले नाव तात्काळ या कार्यालयाकडे प्रत्यक्ष भेटुन नोंद करावयाचे आहे.
अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र-०२३६२-२२८८२०/ ९३२२०५१२८४ वर संपर्क करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिद्र सुकटे यांनी केले आहे.

