You are currently viewing सावंतवाडीत विजयादशमी सोहळ्यास भाजप युवा नेते विशाल परब यांची उपस्थिती

सावंतवाडीत विजयादशमी सोहळ्यास भाजप युवा नेते विशाल परब यांची उपस्थिती

संघाच्या संचलनात सहभाग घेऊन राष्ट्रवाद आणि स्वयंसेवकांच्या त्यागाचे केले गौरवपूर्ण स्मरण

सावंतवाडी :

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून खास विजयादशमी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी आपली उपस्थिती दर्शवली. या सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे भाग्य लाभल्याची भावना श्री. परब यांनी व्यक्त केली.

या निमित्ताने शहरात संघाच्या माध्यमातून संचलन काढण्यात आले. या संचलनातही श्री. परब यांनी सहभाग घेतला.

यावेळी आपल्या विचारांतून श्री. परब म्हणाले, “एका पिढीची प्रखर राष्ट्रवादाची धगधगती मशाल होताना पाहणे हा अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. संघाच्या शताब्दीकडे पोहोचलेल्या या गौरवशाली वाटचालीत तन-मन-धनपूर्वक राष्ट्रभक्ती केलेल्या हजारो ज्ञात-अज्ञात स्वयंसेवकांचा त्याग प्रेरणादायी आहे.”

त्यांनी पुढे सांगितले की, “अनेकांच्या बलिदानातून हिंदुत्वाचे प्रतीक म्हणून हा पवित्र भगवा झेंडा आजही तेजोमयतेने फडकत आहे. या पवित्र गंगेला धरतीवर आणण्यासाठी अहर्निश ध्येयसाधना करणारे संघसंस्थापक डॉ. केशव हेडगेवार आणि सर्व ज्येष्ठ स्वयंसेवक हेच आपल्या प्रेरणास्थान आहेत.”

या शुभप्रसंगी श्री. परब यांनी संघसंस्थापक आणि सर्व स्वयंसेवकांच्या स्मृतींना प्रणाम केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा