You are currently viewing वेंगुर्लेत भाजप तालुका कार्यालयात महात्मा गांधीं व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन !

वेंगुर्लेत भाजप तालुका कार्यालयात महात्मा गांधीं व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन !

*वेंगुर्लेत भाजप तालुका कार्यालयात महात्मा गांधीं व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन !!!*

वेंगुर्ले

वेंगुर्ले भाजपा कार्यालयात महात्मा गांधीं व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जेष्ठ कार्यकर्ते दिपक भगत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .
यावेळी मान्यवरांनी भारतरत्न मा.पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री व राष्ट्रपिता महात्मा गांधीं यांच्याबद्दल गौरव उद्गगार काढताना म्हणाले कि , भारताच्या राजकीय क्षितिजावर साधेपणा , सचोटी आणि असामान्य ध्येयनिष्ठा या गुणांनी तळपणारे एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व म्हणजे लाल बहादूर शास्त्री . ” जय जवान जय किसान ” या एकाच घोषणेने त्यांनी संपूर्ण राष्ट्राला नवी उर्जा दिली .
तसेच मोहनदास करमचंद गांधी हे केवळ एक नाव नाही तर सत्य , अहींसा आणि साधेपणा या मुल्यांचा जिवंत वारसा आहे . 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात राज्यातील पोरबंदर येथे जल्मलेला सर्वसामान्य माणुस पुढे जगाला शांततेच्या क्रांतीची दिशा देणारा युगपुरुष बनला .
यावेळी विष्णू उर्फ पपू परब, प्रसन्न उर्फ बाळू देसाई, राजन गिरप, सुहास गवंडलकर,सुषमा खानोलकर , राजबा सावंत, सुभाष बोवलेकर, अनिल तेंडोलकर, सत्यवान पालव, संजय मळगावकर, हेमंत गावडे, प्रणव वायंगणकर , ज्ञानेश्वर केळजी , चेतना रजपूत , श्रेया मयेकर , ईशा मोंडकर , मनवेल फर्नांडिस , रसिका मठकर उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा