You are currently viewing स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियनांतर्गत महिला कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियनांतर्गत महिला कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियनांतर्गत महिला कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

सिंधुदुर्गनगरी 

 महिलांचे आरोग्य व सक्षमीकरण हे कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीचे प्रमुख केंद्रस्थान आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत स्वस्थ नारी सशक्त परिवार हे विशेष अभियान दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर, 2025 या कालाधीत संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत महिला कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन दिनांक 30 सप्टेंबर, 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले.

            या शिबीराचा शुभारंभ जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील मायनाक भंडारी सभागृह येथे करण्यात आला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी  उपस्थित होत्या. या शिबिराचा 86 महिलांनी लाभ घेतला. यावेळी 76 महिलांच्या विविध रक्त चाचण्या करण्यात आल्या. यासाठी प्राथमिक अरोग्य केंद्र, कसाल येथील वैद्यकीय पथक व जिल्हा रुग्णालयातील तज्ज्ञ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा