_*भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची सावंतवाडीत स्वच्छता रॅली…..*_
_*पथनाट्य व गाण्यांद्वारे केली जनजागृती…..*_
सावंतवाडी
_यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या प्रायमरी विभागातील विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छता हीच सेवा’ हे ब्रीदवाक्य घेऊन सावंतवाडी शहरात रॅली व पथनाट्याद्वारे जनजागृती केली. उद्या, २ ऑक्टोबर रोजी साजऱ्या केल्या जाणाऱ्या महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंतीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबवला._
_रॅलीची सुरुवात श्रीराम वाचन मंदिरासमोरून झाली. त्यानंतर बाजारपेठेतून फेरी काढत विद्यार्थ्यांनी नागरिकांचे लक्ष वेधले. गांधी चौकात पोहोचून स्वच्छता व अहिंसेवर आधारित पथनाट्य सादर केले. घोषणाबाजी करत गांधीजींचा स्वच्छतेचा संदेश आचरणात आणा असे नागरिकांना आवाहन केले. यावेळी स्वच्छतेचा संदेश देणारी आपट्याची पाने तयार करून नागरिकांमध्ये वितरित करण्यात आली._
_सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुमित पिरणकर यांनी वाहतूक व्यवस्थापन करून कार्यक्रम होण्यास मदत केली. बाजारपेठेतील नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी शाळेच्या उपमुख्याध्यापिका अवंतिका नाईक, शिक्षववर्ग,- प्रीती डोंगरे, महादेवी मलगर, रसिका कंग्राळकर, महिमा चारी, रुतुजा तुळसकर, प्राची परब, बाबू भुसारी, संदीप पेडणेकर, सचिन हरमलकर आणि कर्मचारी अस्मिता परब, वैभवी बोवलेकर, महेश पालव, प्रकाश धुरी उपस्थित होते._

