४४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन संचालक मंडळाची निवड; मुदत ठेवींवर आकर्षक व्याजदरांची घोषणा
मुंबई:
परब को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., मुंबईची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पंतनगर, घाटकोपर (पूर्व) येथील बालविकास व्यायाम मंदिर हॉलमध्ये उत्साहात संपन्न झाली. या सभेत सोसायटीच्या अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांची सलग तिसऱ्यांदा एकमताने निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण, उर्फ दीपक परब होते.
यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष श्री. अनिल परब, सचिव श्रीमती प्रतीक्षा परब, खजिनदार श्री. सोमा परब, माजी अध्यक्ष श्री. अशोक परब, परब मराठा समाज मुंबईचे सरचिटणीस श्री. जी. एस. परब तसेच बाल विकास व्यायाम मंदिर हॉलचे श्री. सत्यवान परब आदी उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष निवडीसह नवीन संचालक मंडळ निवडण्यात आले. सभासद श्री. सुनील प्रभू यांनी अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण परब यांचा शाल श्रीफळ सत्कार करत अभिनंदन केले. तसेच नवीन संचालक मंडळ सदस्यांचे अभिनंदन केले.
यावेळी बोलताना अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण परब म्हणाले, परब को- ऑप. क्रेडिट सोसायटी ही सर्वसामान्यांची संस्था आहे. या सोसायटीत परब मराठा समाजातील व्यक्तींबरोबरच इतर समाजातील व्यक्तीही सभासद होऊ शकतात. या सोसायटीत १२ महिने मुदत ठेवीवर ९ टक्के व्याजदर तसेच १५ महिने मुदत ठेवीवर १० टक्के व्याज देण्यात येणार असल्याचे यावेळी श्री. परब यांनी जाहीर केले. यावेळी सोसायटीचे सर्व संचालक मंडळ सदस्य उपस्थित होते. सौ राधिका परब, वैभववाडीहून श्री. शैलेंद्रकुमार परब, कांदळगावहून श्री. शैलेंद्र परब व श्री. गुरुदास परब तसेच वेंगुर्ल्याहून श्री. संजय परब सभेस उपस्थित राहिले. तसेच सभेला सोसायटीचे सभासद, निमंत्रित मान्यवर तसेच गुणवंत विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
