*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*गोठणारं…माझं व्यक्तीमत्व !!*
मन …गोंधळात अडकलं
साॅक्रेटीस वाचायला घेतो… मी
माझ्याच लोकांनी फसवलं
गीता वाचायला घेतो ……मी
अश्यावेळी माझ्यात वसलेला देवदूत
मानवी अग्नीपरिक्षा.. देऊ लागतो
तेव्हा मी माझे हात त्याच्या हातात देत
खोलवर त्याच्या डोळ्यांत बघत राहतो
स्वतःच …गोठतं जाणार व्यक्तीमत्व
सुर्यास्ताच्या अंगानं काठ पकडत जातं
माझं स्थान भूतलावर अढळ राहणारच
म्हणून ध्रुवता-याशी उठाठेव करत राहतं
सारा प्रकाशझोत माझ्या चेहर्यावर
साॅक्रेटीस!कृष्ण!शेजारी उभे राहिले
उराशी जपलेले पराभव सोबत घेऊन
ते दोघे….पुस्तकात अदृश्य झाले..
कलियुगातील कवी माणूस मी
गोठलेले व्यक्तीमत्व तृषाकांत होतं
कल्पनाविलासात वावरणार कवीमन
मृगजळाच्या मागे धावत राहत..!!!
बाबा ठाकूर
ब्रिटिश काऊन्सिल अनुवादीत..

