You are currently viewing शेतकरी जगला पाहिजे

शेतकरी जगला पाहिजे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*शेतकरी जगला पाहिजे*

 

मातीत राबणारा शेतकरी

मातीत घाम गाळतो

पिक भारावर येत तेव्हा

पाऊस अवकाळी येतो

 

माती गर्भार होईपर्यंत

त्यांचं रोज मरण असतं

शेतकऱ्यांला राजा म्हणतात

पण राजासारख त्याच जगणं नसतं

 

मोठ्या आशेने स्वप्न पेरायची

पण हाती काहीच लागत नाही

हा अवकाळीचा फेरा

त्याचा पिछा सोडत नाही

 

पाऊस मरण देत

सरकार तारण घेत

मरेपर्यंत घरावर त्याच्या

कर्जाच तोरणं राहतं

 

एक घास सुखाचाही

पोटात त्याच्या जात नाही

डोळ्यात कायम अश्रु असतात

चेहऱ्यावर हसू कधी येत नाही

 

सणासुदीलाही ताटात त्याच्या

कोरडी भाकरच असते

एक भाकरीचे चार तुकडे

चार ताटात दिसते

 

काय असतो त्याचा गुन्हा की

त्याच्या नशिबी दुःखाच पिक याव

कसा काढावा राग पावसावर

की डोळ्यांदेखत सारं वाहून न्याव

 

खरचं शेतकरी जगला पाहिजे

कारणं त्याच्या भुकेच्या हिशोबाने

त्याच जगण्याचं गणित मांडलं जातं

पण राजकारणाच्या हिशोबात

त्यांचं जगणं वजा होत.

 

अरे नका करून त्यांच्या मरणाची बातमी

त्याच्या पिकाला एकदा तरी हमी भाव द्या

त्याच्या अंधारलेल्या झोपडीमध्ये

कधीतरी समृद्धीचा दिवा पेटू द्या

 

*संजय धनगव्हाळ*

*(अर्थात कुसूमाई)*

९५८९११३५४७

९४२२८९२६१८

प्रतिक्रिया व्यक्त करा