पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत वसुधाज योगा अँड फिटनेस अकॅडमीचा उपक्रम
वेंगुर्ले :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा साजरा करण्याच्या उपक्रमांतर्गत वसुधाज योगा अँड फिटनेस अकॅडमी, वेंगुर्ले यांच्या वतीने “योग सेवा” उपक्रम राबविण्यात आला.
भाजप वेंगुर्ला महिला आघाडीच्या सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातकरी समाजातील मुलांना नाग्या म्हादू आदिवासी वसतिगृह, वेताळ बांबर्डे येथे स्पोर्ट्स योगासनाचे प्रशिक्षण देण्यात आले.
या मुलांना कायमस्वरूपी आणि विनामूल्य प्रशिक्षण दिले जाणार असून, डॉ. सौ. वसुधा मोरे यांनी स्वतः मार्गदर्शन केले. त्यांच्या सोबत श्री. रामा पोळजी, श्री. मनोज बेहरे, श्री. गौरव गंगावणे आणि श्रीमती मोना नाईक यांनीही मुलांना प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले.
भाजप महिला मोर्चा वेंगुर्लेच्या कार्यकर्त्या सौ. वृंदा मोर्डेकर यांनी या उपक्रमात विशेष सहकार्य केले. डॉ. मोरे यांनी या मुलांना ऑलिंपिक स्तरावरील स्पर्धांसाठी तयार करण्याचा संकल्प व्यक्त केला व त्यासाठी निरंतर सराव करण्यासाठी प्रोत्साहन दिले.
दरम्यान, कोणत्याही शासकीय मदतीशिवाय या मुलांचा सांभाळ करणारे श्री. उदय आईर व त्यांची पत्नी सौ. उजा आईर यांनी या उपक्रमाला सहकार्य करत सर्वांचे आभार मानले.

