सावंतवाडीत आज होणार ‘मेघ मल्हार’चा सुरेल नजराणा
सावंतवाडी
माठेवाडा नवरात्रोत्सव मंडळाच्यावतीने आज एक खास संगीतमय कार्यक्रम ‘मेघ मल्हार’ आयोजित करण्यात आला आहे. आत्मेश्वर मंदिर, माठेवाडा येथे रात्री 8 वाजता हा कार्यक्रम रंगणार असून संगीतप्रेमींना मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील गाजलेली गीते ऐकायला मिळणार आहेत.
हा सुरेल सोहळा माजी मंत्री व आमदार दीपक केसरकर यांच्या पुढाकारातून, स्वप्नील पंडित यांच्या संकल्पनेतून साकारला जात आहे. सुप्रसिद्ध गायिका अमृता दहीवेलकर, तसेच गायक अनुज प्रताप आणि धनराज सरतापे आपल्या सुमधुर आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन दीप काकडे करणार असून ‘मेघ मल्हार’ ऑर्केस्ट्राची संगती या कार्यक्रमाची शान वाढवणार आहे.
संगीतप्रेमींना एक अविस्मरणीय संगीतमय अनुभव देणाऱ्या या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
