You are currently viewing आंबोली ग्रामपंचायतीचे सदस्य काशीराम राऊत यांचा भाजपात प्रवेश

आंबोली ग्रामपंचायतीचे सदस्य काशीराम राऊत यांचा भाजपात प्रवेश

प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर व जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांसह प्रवेश

 

सावंतवाडी :

आंबोली ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य उबाठा पक्षाचे कार्यकर्ते काशीराम मालू राऊत यांनी असंख्य कार्यकर्त्यांसोबत भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर आणि जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मोठा धक्का मानला जात आहे.

आंबोली ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच उबाठा पक्षाचे कार्यकर्ते काशीराम मालू राऊत यांनी आज भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदिप गावडे यांच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्त्यांसोबत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर व जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला.

भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पक्ष संघटना वाढीसाठी यापुढे सदैव कार्य करत राहू तसेच जनतेच्या हिताचे कार्य करण्यासाठी कायम कटिबद्ध प्रयत्नशील राहू. भाजपा पक्ष हा शिस्तीचा आणि पक्ष संघटनेच्या ध्येय धोरणाशी सदैव एकनिष्ठ असलेला पक्ष आहे. त्यामुळे अशा पक्षामध्ये काम करणे ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे असे यावेळी श्री राऊत म्हणाले.

यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळशेकर, सरचिटणीस महेश सारंग, मनोज नाईक, आंबोली मंडळ अध्यक्ष संतोष राऊळ, आंबोली सरपंच सावित्री पालेकर, चौकूळ सरपंच गुलाबराव गावडे,गेळे सरपंच सागर ढोकरे, आंबोली मंडळ उपाध्यक्ष रामा गावडे,उपसरपंच दत्तू नार्वेकर, विजय गवस, बूथ अध्यक्ष, व आंबोली पंचायत समितीमधील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा