मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला प्रथम वर्ष विद्यार्थी स्वागत समारंभ .
चिपळूण, मांडकी-पालवण
कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय व जिजामाता महिला कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम वर्ष स्वागत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पी.जी. फार्मचे संस्थापक मा.श्री. विजयसिंह भोसले हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. निखिल चोरगे केली उपस्थित होते.
प्रथम वर्षातील विद्यार्थी स्वागत समारंभाच्या प्रमुख पाहुण्यांच्या भाषणात मा. श्री. विजयसिंह भोसले यांनी विद्यार्थ्यांनी एकच ध्येय ठरवून ध्येय वेडे होऊन ते साध्य करण्याचे प्रयत्न करावे. नैतिकता, ध्येयवादी आणि मेहनती असे सर्वांगीण गुण विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे. याच कृषी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असल्याकारणाने त्यांनी त्यांच्या देखील जुन्या आठवणी विद्यार्थ्यांसमोर मांडल्या, महाविद्यालयाने कशा पद्धतीने आपल्याला घडवले याचा देखील आवर्जून उल्लेख केला. अध्यक्षीय भाषणात डॉ. निखिल चोरगे यांनी देखील विद्यार्थ्यांनी पदवी अभ्यासक्रमात असतानाच ध्येय निश्चित करून वेळेचे नियोजन करून ते साध्य करावे. त्याच पद्धतीने सर्व महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या पाठीशी असून नवनवीन कल्पनांना बळ देण्याचे काम देखील संस्था करते. विद्यार्थ्यांनी देखील संशोधनावर भर द्यावा आणि चांगले यशस्वी व्हावे, सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या.
या कार्यक्रमासाठी कृषीभूषण तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे , प्रमुख पाहुणे पी.जी. फार्म चे संस्थापक मा.श्री. विजयसिंह भोसले, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. बाळासाहेब सूर्यवंशी, ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. पांडुरंग मोहिते, डॉ. सुनील दिवाळे तसेच सर्व प्राध्यापक व प्रथम वर्ष व द्वितीय वर्षातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. श्रद्धा डावळे व आभार प्रदर्शन हे कु. स्वरांजली रामशे हिने केले.

