*ज्येष्ठ लेखिका कवयित्री चित्रकारा आदर्श शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*📚 वाचाल तरच वाचाल! 📚*
📖📖📖📖📖📖📖
वाचता वाचता खरंच वाचलो
नाहीतर भटकतअसतो गेलो
कुठेतरी खबडग्यात मजुराचे
काम शोधीत असतो फिरलो.
वाचनासाठी व्हावेच साक्षर
कुणी राहू नये कधी निरक्षर
त्यामुळे परिणाम होभयंकर
लोक हसतात ठेवून अंतर.
वाचनाने जीवनातली प्रगती
ठेवते आपली शाबूत मती
रोज नव्याने घडे चमत्कार
आयुष्य आकारित घेते गती.
जो असे साक्षर त्यास निरंतर
सन्मानाने मिळे, खरा आदर
सगेसोयरे, मित्र मंडळ करती
विचारपूस आणि पाहुणचार.
राबवा पुन्हा साक्षरता अभियान
राहू नये कुणी अडाणी निरक्षर
जेव्हा होईल सुशिक्षित जनता
तेव्हा आपोआप वाचन प्रसार.
स्वतः पासूनच करा सुरुवात
ज्ञानज्योतिचे चालवा अभियान
दिसेकुणी निरक्षर,शिकवाअक्षर
सुविचार,सुवाचन,शुद्धलेखन
फुलवा मग तो ज्ञानाविष्कार
वाचनाने उघडे मनाचे द्वार
करती मनी सुंदर सुविचार
आचरणातही घडे साक्षात्कार.
🪷🪷🪷🪷🪷🪷
📖📖📖
स्वप्नगंधा सतीश आंबेतकर
विरार.

