You are currently viewing अभ्युदय कला दालनमध्ये जागतिक महिला दिन हर्षोल्हासाने संपन्न

अभ्युदय कला दालनमध्ये जागतिक महिला दिन हर्षोल्हासाने संपन्न

मुंबई :

 

आंतरराष्ट्रीय महिला दिन ही खरं तर कामगार चळवळीची निर्मिती आहे. याची सुरुवात ८ मार्च १९०८ रोजी न्यू यॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील १५ हजार स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शनं केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमी निरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा, अशी मागणीही केली. केलेल्या कामांनुसार मोबदला मिळावा आणि मतदानाचा हक्कही मिळावा, अशी या महिलांची मागणी होती. महिलांच्या या निषेधाच्या एका वर्षानंतर, अमेरिकेच्या सोशलिस्ट पार्टीनं पहिला राष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याची घोषणा केली.

भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला. ८ मार्च १९७१ ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने ‘जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केलं. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचं स्वरूप बदलत गेले, तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या.

हाच महिला सक्षमीकरणाचा वसा मुंबईच्या काळाचौकी परिसरात सक्षमपणे कार्य करत असणार्‍या “अभ्युदय कला दालन” येथे रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी मोठ्या आनंदात आणि हर्षोल्हासाने साजरा करण्यात आला.

बाल शिशू वर्गापासून ते निवृत्तीनंतरही समाजाच्या विविध स्तरांवर कार्यरत असणार्‍या राजमाता जिजाऊंच्या लेकींनी आपला ठसा कार्यक्रमावर उमटवला. सुनिता गोरे, पुष्पा कदम, अर्चना कोतावडेकर, केतकी यंदे, मोहिनी दहिफळे, मंजुला सांडीस, प्रेरणा कदम, शुभदा दळवी, सीमा खाडे, सुनंदा लोखंडे, रेश्मा भंडारी, वैशाली कुर्‍हाडे, दीपा गधाडे, साधना वायदंडे, मिनाक्षी कडू, शशिकला जयस्वाल, जयश्री शिरसाट, दीपा धाडवे, किरण भुजबळ, बालगायिका वेदश्री जाधव, खुशी विकी गोरे, उन्नती यंदे, ऋतुजा भुजबळ, सचिन लोखंडे, राधिका लोखंडे, साई लोखंडे, मालन विलास लोखंडे, विघ्नेश विकी गोरे, अनिरुद्ध कदम, जयश्री बडे, शिवण्या दहिफळे, ज्ञानेश्वरी बडे, सही बडे, रुद्रा बडे यांच्यासह विभागातील अनेक महिलांनी विविध कलागुणांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाला शिवसेना (उबाठा) मा. नगरसेवक दत्ताराम पोंगडे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून सर्व महिलांना खूप सार्‍या शुभेच्छा दिल्या. अभ्युदय कला दालनचे ज्येष्ठ सदस्य मनोहर डंबे (बाबा), तसेच युवा उद्योजक उदय अशोक पवार, महर्षी दयानंद महाविद्यालयामध्ये कार्यरत असलेले प्रा. माने सर, निवृत्त शिक्षक शरद दळवी, अजित देसाई, चंद्रकांत परब, विनायक जाधव यांनी देखील उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

अशोक सावंत, मंदार चिखले यांनी सुमधूर स्वरांनी कार्यक्रमात रंगत आणली. वन्स मोअर मिळवत असतानाच वन मोअर गाणं सादर करत उपस्थित महिला आणि रसिक वर्गाला आपल्या सोबत ताल धरायला भाग पाडले.

कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न होण्यासाठी उदय अशोक पवार, अशोक पवार, शुभदा शरद दळवी, सुनिता गोरे, महेंद्र सातपुते, माने सर, पुष्पा कदम, अशोक सावंत, विनायक जाधव यांनी बहुमूल्य सहकार्य करून अभ्युदय कला दालनचे कार्य उत्कृष्टपणे सांभाळणार्‍या गुरुदत्त वाकदेकर यांच्यामागे आम्ही ठामपणे उभे आहोत याची ग्वाही दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा