You are currently viewing के.एल.पोंदा.शाळेत इनरव्हिल क्लब ऑफ डहाणू तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप !

के.एल.पोंदा.शाळेत इनरव्हिल क्लब ऑफ डहाणू तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप !

डहाणू :

दिनांक २४सष्टेंबर रोजी, दी डहाणू एज्यूकेशन ट्रस्ट संचलित शाळा के.एल.पोंदा.हायस्कूल, डहाणू येथे इयत्ता ७वी तील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप तसेच चाॅकलेट वाटप करण्यात आले.

शाळेतील उपक्रमशील, आदर्श शिक्षिका सौ.अनुपमा जाधव यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन करण्यात आले. उपस्थित पाहुण्यांना विविध प्रकारच्या फुलांची रोपे भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

आपल्या पाणी या कवितेतून पाणी म्हणजे जीवन

जीवन म्हणजे पाणी

पाण्याचा खेळ कधी

करु नये कोणी.

 

झाडे लावा,

झाडे जगवा

शेततळी करुन

पाणी साठवा.

 

यातून पर्यावरण जनजागृतीचा संदेश देखील दिला.तसेच त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून कवी विंदा करंदीकराच्या कवितेच्या काही ओळी सादर करुन.. देणाऱ्याने देत जावे

घेणाऱ्याने घेत जावे

घेता घेता एक दिवस

देणाऱ्याचे हात घ्यावेत

म्हणून आपण सर्वांनी हा दातृत्वाचा गुण घ्यावा. इनरव्हिल क्लब अध्यक्षा सौ.हर्षला नायर यांच्या कार्याचा परिचय करुन देण्यात आला.तसेच त्या याच शाळेच्या माझी विद्यार्थ्यांनी आहेत. यामुळे त्यांचे आपल्या शाळेवर असणार प्रेम हे त्यांनी शैक्षणिक साहित्य वाटप करुन कृतज्ञता व्यक्त केली आहे.

 

या कार्यक्रमात इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा मा.सौ.हर्षला नायर, मा.सौ.राजश्री कुलकर्णी, मा.सौ.सुधा ठाकूर, तसेच मुख्याध्यापक मा.श्री.सोपान इंगळे सर, यांनी आपल्या भाषणातून दिलेल्या शैक्षणिक साहित्याचा वापर करुन खूप चांगला अभ्यास करा.सुंदर लेखन करा.तसेच हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी सौ.अनुपमा जाधव मॅडम या राबवित आहेत.ध्यास प्रतिष्ठान व इनरव्हिल क्लब ऑफ डहाणू तर्फे गेल्या वर्षी देखील असे विविध उपक्रम त्यांनी राबवले म्हणून आनंद व्यक्त केला .केला.उपमुख्याध्यापिका मा. सौ.रसिका घागस मॅडम, पर्यवेक्षक, मा.श्री.सुनिल मोरे सर, मा.पर्यवेक्षिका सौ.मनिषा पटेल मॅडम उपस्थित होत्या.या सर्वांनी हा उपक्रम चांगला राबवित असल्याचाआनंद व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.

तसेच विद्यार्थ्यांच्या आनंदाला जणू उधाण आले होते.

 

कु.आलिया खान,कु.रेखा भूल,चि.गोरक्ष मोरे चि.ध्येय या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करुन आभार मानले.

या कार्यक्रमाला जणू चार चांद लागले.

प्रतिक्रिया व्यक्त करा