You are currently viewing मराठा बांधवांची उद्या 28 रोजी साटेली – भेडशी येथे भव्य कार रॅली..

मराठा बांधवांची उद्या 28 रोजी साटेली – भेडशी येथे भव्य कार रॅली..

दोडामार्ग :

 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग यांचा जाहीर पाठिंबा असून त्यानिमित्ताने जनजागृती करण्यासाठी शनिवारी २८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता साटेली-भेडशी येथे ॲड. सुहास सावंत व आरक्षण अभ्यासक राजेंद्र निकम यांचे मार्गदर्शन व त्यानंतर भव्य कार रॅली काढण्यात येणार आहे. त्यामुळे समस्त मराठा बांधवांनी या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघ दोडामार्ग तालुका अध्यक्ष ॲड. सोनू गवस व सचिव उदय पास्ते यांनी केले आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण केले होते. या उपोषणाची सरकारने दखल घेतली व ४० दिवसांत आरक्षणाबाबत निर्णय घेतला जाईल असे आश्वासन मनोज जरांगे-पाटील यांना दिले होते. मात्र या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने जरांगे-पाटील यांनी पुन्हा बुधवारपासून आंदोलन करण्यास सुरुवात केली. या आंदोलनाला अखिल भारतीय मराठा महासंघाने पाठिंबा दर्शविला आहे. तसेच जनजागृती करण्यासाठी साटेली-भेडशी येथून शनिवार दिनांक २८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. एका सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेस आरक्षण अभ्यासक राजेंद्र निकम व अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ॲड सुहास सावंत हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर भव्य कार रॅलीला सुरूवात करून दोडामार्ग, बांदा, शिरोडा ते मठ वेंगुर्ला अशी नेत पहिल्या दिवसाची समाप्ती होणार आहेत. या सभेला व रॅलीला तमाम मराठा बांधवांनी आपल्या कार गाडीसह उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघ तालुकाध्यक्ष ॲड. सोनू गवस व सचिव उदय पास्ते यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा