You are currently viewing स्नेह नागरी सहकारी पतसंस्थेचे रौप्यमहोत्सवी संमेलन शनिवारी २७ सप्टेंबर रोजी

स्नेह नागरी सहकारी पतसंस्थेचे रौप्यमहोत्सवी संमेलन शनिवारी २७ सप्टेंबर रोजी

स्नेह नागरी सहकारी पतसंस्थेचे रौप्यमहोत्सवी संमेलन शनिवारी २७ सप्टेंबर रोजी

सावंतवाडी (प्रतिनिधी) :

आपणा सर्वांच्या आशीर्वादाने व सहकार्याने “स्नेह नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सावंतवाडी” या संस्थेच्या रौप्यमहोत्सवी स्नेह संमेलनाचे आयोजन शनिवार दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता नॅब सभागृह, पहिला मजला, नॅब नेत्र रुग्णालय, भटवाडी, सावंतवाडी येथे करण्यात आले आहे.

या विशेष कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. नितेशजी राणे (पालकमंत्री, जिल्हा सिंधुदुर्ग), मा. श्री. बाळ परब साहेब (जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था), मा. श्री. दिपकभाई केसरकर (माजी शालेय शिक्षणमंत्री व आमदार, सावंतवाडी), मा. श्री. मनिषजी दळवी (अध्यक्ष, सिं.जि.मध्य. सह. बँक लि., सिंधुदुर्ग), व मा. अॅड. सिद्धार्थ भांबुरे (अध्यक्ष, रोटरी क्लब, सावंतवाडी) यांची उपस्थिती लाभणार आहे.

संस्थेच्या या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्नेह संमेलनासाठी नागरिकांनी, सभासदांनी व हितचिंतकांनी सहकुटुंब, सहपरिवार, मित्रमंडळींसह उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. पल्लवी दिपक केसरकर आणि संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

संचालक मंडळात श्री. किरण ठाकूर, डॉ. अजय स्वार, सौ. वैभवी शेवडे, श्री. अनंत उचगांवकर, श्री. नारायण कशाळीकर, श्री. सोमनाथ जिगजीनी, श्री. साबाजी कदम, श्री. मोतीराम मिशाळ, श्री. शिवकुमार उचगांवकर यांचा समावेश असून कार्यक्रमाचे संयोजन सरव्यवस्थापिका सौ. संगीता प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा