शिरोडा वेळागरच्या मालिनीची चमकदार भरारी;
राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत 1st रनर अपचा बहुमान
शिरोडा
शिरोडा वेळागर (ता. वेंगुर्ला)
येथील युवती मालिनी मदन अमरे हिने नुकत्याच पुणे, पिंपरी-चिंचवड येथे पार पडलेल्या कशिश प्रोडक्शन मिस ग्लोबल इंडिया 2025 या भव्य सौंदर्य स्पर्धेत 1st रनर अप म्हणून घवघवीत यश संपादन केले आहे.
ही स्पर्धा श्री. योगेश पवार यांच्या कशिश प्रोडक्शन तर्फे आयोजित करण्यात आली होती. अंतिम फेरीत आपल्या आत्मविश्वासपूर्ण आणि आकर्षक सादरीकरणामुळे मालिनीने परीक्षकांची मने जिंकून हे स्थान पटकावले.
या यशामुळे मालिनीने कोंकणचा डंका पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर वाजवला आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्वत्र तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.
