You are currently viewing दीपक केसरकरांकडून हत्ती “वनतारा” मध्ये नेण्याची घोषणा तरी पूर्ण होईल का…? – एकनाथ नाडकर्णी

दीपक केसरकरांकडून हत्ती “वनतारा” मध्ये नेण्याची घोषणा तरी पूर्ण होईल का…? – एकनाथ नाडकर्णी

दीपक केसरकरांकडून हत्ती “वनतारा” मध्ये नेण्याची घोषणा तरी पूर्ण होईल का…? – एकनाथ नाडकर्णी

​दोडामार्ग

तालुक्यातील सर्व हत्ती वनतारा येथे पाठवण्याचे आश्वासन देणाऱ्या आमदार दीपक केसरकर यांच्यावर आता जनतेचा विश्वास राहिलेला नाही, अशी खरमरीत टीका भाजपचे पदाधिकारी एकनाथ नाडकर्णी यांनी केली आहे. हत्ती पकड मोहीम राबवून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासह केसरकर यांनी अनेक विकासकामांची आश्वासने दिली. मात्र ती पूर्ण झाली नाहीत, असेही नाडकर्णी म्हणाले.


याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे. त्यात असे म्हटले आहे की, जनतेने केसरकर यांना तीन वेळा भरघोस मतांनी निवडून दिले आहे. प्रत्येक निवडणुकीत त्यांनी हत्तींचा प्रश्न सोडवून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र एकदाही हे आश्वासन पूर्ण झाले नाही. याशिवाय तिलारी धरण परिसरात अम्युझमेंट पार्क उभारणे, चष्म्याचा कारखाना आणणे, आणि आडाळी एमआयडीसीमध्ये उद्योग सुरू करण्याची अनेक आश्वासनेही त्यांनी दिली होती. ही सर्व आश्वासने आजपर्यंत फेल ठरली आहेत. त्यामुळे हत्ती पकड मोहीम राबवण्याचे आश्वासन देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करू नये, असे नाडकर्णी यांनी स्पष्ट केले.

​​नाडकर्णी यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्यावर विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, येत्या काळात हत्ती पकड मोहीम राबवण्याचा शब्द पालकमंत्री राणे यांनी दिला आहे आणि त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे लवकरच श्री. राणे यांच्या प्रयत्नांतून ही मोहीम पूर्ण होईल. ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी आपण शेतकरी असल्याची केवळ वल्गना करतात. मात्र त्यांना शेतकऱ्यांचे काहीही देणेघेणे नाही. यापूर्वी खासदार विनायक राऊत आणि आमदार दीपक केसरकर यांच्यासोबत काम करत असताना हत्तींचा प्रश्न गंभीर असताना त्यांनी कधीही यावर आवाज उठवला नाही, असे नाडकर्णी म्हणाले. ​नाडकर्णी म्हणाले की, धुरी फक्त पक्षाकडून कार्यक्रम आल्यावर बेताल वक्तव्य करतात. त्यांच्यासोबत आता कार्यकर्तेही दिसत नाहीत. जिल्हाध्यक्ष म्हणून ते काहीही बोलत फिरत आहेत. त्यामुळे त्यांनी पालकमंत्री राणे यांचे काम आधी पाहावे आणि मगच बोलावे. तसेच आपल्या भिकेकोनाळ गावातील गाईंवर लक्ष देण्याचा सल्लाही नाडकर्णी यांनी धुरी यांना दिला. कारण त्या गाई आसपासच्या गावांमध्ये सोडून दिल्याने नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा