You are currently viewing घाटा वरती येऊन थाटात

घाटा वरती येऊन थाटात

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*घाटा वरती येऊन थाटात*

 

घाटा वरती येऊन थाटात

भोजन “भरवते” पितरांना

तमा न तुज कडक उन्हाची

खुशीत दिसते *हंसताना*

//1//

करते वाकडी वाट नदीची

रोजचा दिसतोय तुझा नियम

असो ऊन जरी किती कडक

ठेवतेस मनावर सदा संयम

//2//

थंडीत येतेस तेवढ्याच प्रेमाने

नाही मोडत कधी *शिरस्ता*

ऊन्हाळा पावसाळा सर्व सारखे

हसून नेहमी खातेस *खस्ता*

//3//

गुलाब वेडी *सफेद साडी*

ओळख गेली *तुझी बनून*

मॅचिंग तुझी खास खासियत

मित्र मैत्रीणी आहेत जाणून

//4//

कसे तुजला ग सर्व जमते

फुलते मुखावर *सदाफुली*

हजर जबाबी *आहेस सखे*

दारी तुझ्या ग असून *अबोली*

//5//

मिळून जाईल आशीश तुला

पित्रही आहेत भलतीच खूश

खीर खाऊन *ढेकरा देती*

आवडला आजचा तुझा वेश

//6/_

 

विनायक जोशी 🖋️ठाणे

मीलनध्वनी/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा