You are currently viewing अजूनही

अजूनही

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी मुबारक उमराणी यांची अप्रतिम काव्यरचना

झाडाचे गाणे गात
जगतो मी अजूनही
गंध श्वास घेतानाही
लाजतो मी अजूनही

मनीच्या देवत्वाला
भजतो मी अजूनही
दृष्ट राक्षस आतला
मारतो मी अजूनही

फुलता मी कळ्यात
सुगंध मी अजूनही
तोडता फुलकळी
शहारे मी अजूनही

गंध गंध परिमळ
चाखतो मी अजूनही
मधुरस पोहळ्यात
माखतो मी अजूनही

नव बीज, नव तेज
अंकुरे मी अजूनही
श्वास-निःश्वास ,घेत
वाढतो मी अजूनही

जगतांना आभाळच
होतोय मी अजूनही
बेभान वादळातही
चक्रीय मी अजूनही

थेंबासवे कोसळता
गंधाळी मी अजूनही
फुल सुगंध चाखता
हर्षोतो मी अजूनही

©मुबारक उमराणी
सांगली

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + fourteen =