You are currently viewing नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान ” अंतर्गत सिंधुदुर्गात नेत्र शिबीरांचे आयोजन

नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान ” अंतर्गत सिंधुदुर्गात नेत्र शिबीरांचे आयोजन

*” नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान ” अंतर्गत सिंधुदुर्गात नेत्र शिबीरांचे आयोजन* ——-

*प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा संयोजक – सेवा पंधरवाडा .*

▪️ *मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून नेत्ररोगाशी संबंधित गरजु नागरिकांना मिळणार दिलासा* .
▪️ *शिबिरात मोफत नेत्र तपासणी ,मोतीबिंदु शस्त्रक्रिया , औषधोपचार व मोफत घरपोच चष्मेवाटप होणार.*

पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर ( महात्मा गांधी जयंती ) दरम्यान ” सेवा पंधरवाड्याचे ” आयोजन देशभर करण्यात आले आहे . या सेवा पंधरवाडा अंतर्गत महाराष्ट्रातही ३६ जिल्ह्यामध्ये गाव व तालुका पातळीवर नेत्रशिबीरे आयोजित करुन लाखो नागरिकांना ” मोफत शस्त्रक्रियेचा ” लाभ मिळणार आहे .
सदर नेत्र शिबिरे जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी आरोग्य सेवेचे जिल्हा शल्य चिकित्सक हे जिल्हा समीतीचे अध्यक्ष असुन , सहायक धर्मादाय आयुक्त , अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक , जिल्हा आरोग्य अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डिन , शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रतीनीधी , नोडल अधिकारी mjpjay , CMRF कक्ष वैद्यकीय अधिकारी , डाॅ.गद्रे आय केअर सेंटर , विवेकानंद नेत्रालय – कणकवली , शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , गोवा मेडिकल कॉलेज हे या कमीटीचे सदस्य आहेत .
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पण अशा प्रकारे नेत्रशिबीरांचे आयोजन करण्यात आले असून , त्याची रुपरेशा ठरविण्यासाठी सेवा पंधरवाडा अभियान जिल्हा संयोजक प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी ओरस येथील जिल्हा रुग्णालयात भेट देऊन नेत्र शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब जोशी यांचेशी चर्चा करून नेत्र शिबिरांचे नियोजन केले. यावेळी नेत्र शिबिराचे नोडल ऑफीसर डाॅ.कौस्तुभ देशपांडे , नेत्र चिकित्सा अधिकारी संतोष सावंत उपस्थित होते .
खरतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात १७ सप्टेंबर पासुन कणकवली उपजिल्हा रुग्णालयात पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या शुभहस्ते या शिबिरांचा शुभारंभ झाला .

राज्यातील दहा लाख लोकांना घरपोच चष्मे आणि नेत्र चिकित्सा सोबतच मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करून मिळणार आहे. सिंधुदुर्गात काही ठिकाणी आरोग्य विभागामार्फत सुरुवात सुद्धा झाली आहे
हे अभियान सुरू झाल्यानंतर सोबत दिलेल्या तारखेला त्या त्या तालुक्यातील पी एस सी मध्ये सुरू सुद्धा झाले मोतीबिंदू शस्त्रक्रिया आत्ता पंधरा-वीस हजाराच्या टप्प्यात पोहोचली आहे याचा मोफत लाभ थेट नागरिकांना होणे गरजेचे आहे.

*यासाठी कोणती कागदपत्रे लागतील?*

१) आधार कार्ड
२) रेशनकार्ड
३) जुन्या तपासणीचे रिपोर्ट

*कुठल्या पेशंटला आणावे?*

१) सतत डोळ्यांची जळजळ / पाणी येणे
२) डोळ्यांना सुज
३) धूसर दृष्टी
४) सतत कमी दिसणे
५) कायम डोकेदुखी ने त्रस्त
६) डोळ्यावर मांस / पडदा येणं
७) डोळ्यावर प्रकाश वर्तूळे येणे .
अशा सर्व प्रकारच्या त्रास असलेल्या नागरिकांना गावोगावी लाभ मिळवून दिल्यास नागरिकांना त्याचा फायदा होईल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना मोफत वैद्यकीय साहाय्य मिळेल आणि सोबत चश्मा घरपोच मिळेल.
मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, धर्मादाय कक्ष व जिल्हा प्रशासन हे अभियान राबवत आहे त्यासाठी नोडल ऑफिसर नेमुन दिलेले आहेत.

*”स्वस्थ नारी सशक्त परिवार”*

हे अभियान सुद्धा सुरू झाले असून या अभियानांतर्गत प्रत्येक जिल्हा आणि महापालिका स्तरावर महिला आणि बालकांसाठी विशेष आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलं असून, यावेळी शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि लाभ देण्यात येणार आहे. हे अभियान दोन ऑक्टोबर पर्यंत चालणार असून, सर्व महिला आणि बालकांनी या अभियानात सहभागी व्हावे यासाठी पाठपुरावा करावा.
महिलांसाठी विविध वैद्यकीय तपासण्या मोफत उपलब्ध असतील, ज्यात रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर (स्तन, गर्भाशय आणि तोंड), प्रसूतीपूर्व तपासणी, क्षयरोग, एचआयव्ही, दंत तपासणी, टीबी, सिकल सेल आणि ॲनिमिया यांचा समावेश आहे.
हे अभियान यशस्वीपणे पूर्ण करत १० लाख चश्मे मोफत घरपोच करण्यासाठी भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्ते थेट मदत करण्याचे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

” नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान ” सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयोजित करण्याबाबत नेत्र शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब जोशी यांचेशी चर्चा करताना ” सेवा पंधरवाडा ” अभियान जिल्हा संयोजक प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई.
यावेळी उपस्थित नेत्र शिबिर नोडल ऑफीसर डाॅ.कौस्तुभ देशपांडे व नेत्र चिकीस्ता अधिकारी डाॅ.संतोष सावंत उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा